Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

गणेशोत्सव मंडळाचा आक्षेपार्ह देखावा कल्याण पोलीसांनी केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पोलीसांनी पहाटे तीन वाजता एका गणेश मंडळाच्या ठिकाणी धाव घेत साकारण्यात आलेला आक्षेपार्ह देखावा जप्त करण्याची कारवाई केली आहे. कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त पक्षनिष्ठा या विषयावर देखावा साकारला होता हा देखावा वादग्रस्त असल्याने पोलीसांनी आज पहाटे तीन वाजता मंडळाच्या ठिकाणी धाव घेत साकारण्यात आलेला देखावा जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय तरुण मित्र मंडळ हे गेल्या ५९ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळाकडून दरवर्षी ताज्या घडामोडी वर देखावा साकारण्यात येतो. या मंडळाचे अनेक देखावे हे यापूर्वी वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरलेले आहेत. यावर्षी शिवसेनेत फूट निर्माण झाली. या विषयावर देखावा साकारण्यात आला होता. पक्षनिष्ठा हा या देखाव्याचा विषय होता. या मंडळाला पोलिसांनी यापूर्वीच भादंवि कायदा कलम १४९ अन्वये या मंडळाला नोटीस दिली होती.

देखावा साकारण्यापूर्वी मंडळाने हा देखावा पोलीसांना दाखविला होता, असे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र पोलीसांनी नोटीस मध्ये असे म्हटले होते की देखाव्याचा विषय आक्षेपार्य नसावा व देखावाचा विषय हा देशभक्तीपर असावा असे आवाहनही केले होते .मात्र पक्षनिष्ठेचा हा देखावा ताज्या घडामोडीवर भाष्य करणारा असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीसांनी आज पहाटे ३ वाजता मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांना फोन करून सांगितले की हा देखावा साकारता येणार नाही. अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल मात्र साळवी हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलीसांनी मंडळाच्या ठिकाणी जाऊन साकारण्यात आलेल्या देखाव्याचे सगळे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात विजय साळवी यांनी सांगितले की मंडळाने नेहमीच ताज्या विषयावर देखावे साकारले आहेत. यंदा पक्षातील फुट हा विषय घेण्यात आला होता. मात्र पोलीसांनी देखावा जप्त केला आहे तसेच मंडळाचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही एक प्रकारे हिटलर शाही आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पोलीसांच्या या कारवाईमुळे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून एक प्रकारे त्याची गळचेपी केली जात आहे असा आरोप केला आहे. त्याचबरोबर पोलीसांच्या या कारवाई विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. मंडळाचा देखावा गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे तीन वाजता पोलीसांनी जप्त केल्याने यापुढील गणेशोत्सव मंडळाकडून साजरा केला जाणार नाही. या घटनेचा मंडळाकडून तीव्र निषेध केला असल्याचे साळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *