Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

पर्यावरणवादी युवा संस्था फॉर फ्युचर इंडियाच्या स्वच्छता मोहिमेत अभिनेत्यांचा सहभाग!

भाईंदर, प्रतिनिधी: वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण दूत हर्षद ढगे यांनी For Future India, मिरा भाईंदर महानगपालिका व मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन यांच्या मार्फत उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या स्वच्छता मोहिमेत मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री प्रिया मराठे, अभिनेते शंतनू मोघे, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि जूनियर मिस्टर बीन म्हणून प्रसिद्ध जतीन थानवी, मिस वर्ल्ड -फिटनेस फिजिक श्वेता राठोड प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

“वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. तरी पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करणे” या संकप्लनेला साथ देत अभिनेत्यांनी आपला सहभाग उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियानत नोंदवला.

भव्य स्वच्छता अभियानत २५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग दाखवत १० टनहुन अधिक प्लास्टिक कचरा काढला. अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला होता. फॉर फ्युचर इंडिया संस्थे सोबत, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, मिरा भाईंदर स्वच्छता विभाग, दिव्य प्रकाश प्रतिष्ठान, शोध फाउंडेशन, रॉबिनहुड आर्मी, ऑक्सफोर्ड आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा, ओशियन ओव संस्थेसोबतच अभिनव कॉलेज, ठाकूर कॉलेज, डी. टी. एस. एस. कॉलेज, एस. एन. कॉलेज, अथर्व कॉलेज, नालंदा कॉलेज, लधिदेवी कॉलेज, DGMC कॉलेज महाविद्यालयांच्या विध्यार्थ्यानी सुद्धा सहभाग घेतला होता.

यावेळी मिरा भाईंदर महानगपालिकेचे उप आयुक्त श्री. रवी पवार, फॉर फ्युचर इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे, वन विभागाचे वनपाल श्री. सचिन मोरे, मनीषा गाडेकर, बीट अधिकारी ज्ञानेश्वर म्हस्के, फॉर फ्युचर इंडियाचे ध्रुव कडारा, गणेश नारकर, कुंदन सोळंकी, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन चे अमेय भोगटे, सुमित धोत्रे, लवेश उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *