Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

तिकीट आरक्षण बुकिंगच्या नियमात भारतीय रेल्वेने बदल करत घेतला मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तिकीट आरक्षणाच्या बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे तिकीट काढताना प्रवाशांची होत असलेल्या मोठ्या त्रासातून सुटका मिळाली आहे.

पत्ता भरणे होते आवश्यक

रेल्वेने अनेक दिवस गाड्या बंद ठेवल्या होत्या. यानंतर गाड्या परत सुरू करतानाही अनेक तरतुदी लागू ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेने पुन्हा एकदा डब्यात प्रवाशांना उशी – ब्लँकेट परत देण्यास सुरुवात केली आहे. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशी आणि ब्लँकेट दिले जात आहेत, महामारीच्या काळात हे देखील बंद करण्यात आले होते. रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशन बाबत आदेश जारी केला आहे. डेस्टिनेशनच्या ऍड्रेसने साथीच्या आजारादरम्यान कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मदत केली. जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा त्याला रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. मग रेल्वेनेही अनेक निर्बंध लागू केले. हा देखील त्यापैकीच एक होता.

आता पत्ता भरावा लागणार नाही

प्रवाशांना यापुढे रेल्वे तिकीट काढताना त्यांना जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता आता भरावा लागणार नाही. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे, रेल्वे तिकीट बुक करताना आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइट आणि ऍपवर डेस्टिनेशन पत्ता भरणे पूर्वी अनिवार्य करण्यात आले होते. ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता प्रवाशांना त्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *