Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘बाहुबली’ रॉकेट एलव्हीएम-३ चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी करत ‘इसरो’ ने रचला इतिहास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इसरो’ ने शनिवारी रात्री १२:०७ वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. इसरो चे रॉकेट एलव्हीएम-३ आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला. या प्रक्षेपणासह, ‘इसरो’ने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कारण ‘एलव्हीएम३ – एम२/वनवेब इंडिया १’ हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले. ‘वन वेब’ च्या ३६ रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ‘इसरो’ ने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘एलव्हीएम-३’ म्हणजेच ‘लाँच व्हेईकल मार्क-३’ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री १२:०७ वाजता प्रक्षेपित केले.

२४ तासांचा काउंटडाऊन

एलव्हीएम-३ पूर्वी या रॉकेटला ‘जीएसएलव्ही मार्क रॉकेट’ म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी २४ तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ‘ब्रिटिश स्टार्टअप वनवेब’चे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. ‘वनवेब’ ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. ‘इसरो’ने ‘ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस’ मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे.

‘इसरो’चे अध्यक्ष म्हणाले, ४३.५ मीटर लांब रॉकेट ८,००० किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘एलव्हीएम-३’ द्वारे ३६ वनवेब उपग्रहांचा आणखी एक सेट लॉंच केला जाईल, असेही ते म्हणाले.

‘इसरो’ साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण

हे तीन-स्टेज रॉकेट आहे, ज्यामध्ये दोन ‘सॉलिड मोटर स्टेप्स ऑन’ आणि एक ‘प्रोपोलेंट स्टेज’ आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनी रूपामुळे त्याला इसरोचा बाहुबली असेही म्हणतात. ‘इसरो’ साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे. कारण ‘एलव्हीएम-३ एम२ मिशन’ हे ‘इसरो’ ची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ साठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.

भारताकडून ३०० हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण

जगातील बहुतेक देश आता त्याच्या सर्वात मोठ्या प्रक्षेपणासाठी भारताकडे पाहतो. कारण भारताने आतापर्यंत ३०० हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण केले आहेत आणि जगाला सांगितले आहे की, कमी खर्चातही ध्येय कसे साधले जाऊ शकते. कमी बजेटमध्ये मंगळावर पोहोचून भारताने ते दाखवून दिले होते. त्यामुळे इस्रोवर संपूर्ण जगाचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

आतापर्यंत ‘पीएसएलव्ही’च्या माध्यमातून व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण झाले होते, आता या बाहुबलीच्या व्यावसायिक बाजारपेठेत प्रवेश केल्याने, ‘इसरो’ आणि ‘एनएसआयएल’ साठी नवीन व्यासपीठ उघडणार आहे. या प्रक्षेपणाच्या यशाने, ‘इसरो’ ने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे. हे स्पष्ट आहे की, या ऐतिहासिक क्षणामुळे ‘इसरो’साठी नवीन संधींचे दरवाजे देखील उघडतील, जे थेट महसूलासाठी फायदेशीर ठरतील.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *