Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाना पुन्हा सुरु दिली शेतकऱ्यांना खास दिवाळी भेट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदा अस्मानी संकटाने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी केंद्र शासनाने सहा पिकांच्या रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमतीत वाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत सुमारे नऊ वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

पळस येथील बंद अवस्थेत असलेल्या नाशिक साखर सहकारी कारखाण्याचा गाळप हंगाम २०२२-२३ चा शुंभारंभ नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू असून सामान्य जनतेचे कल्याण व त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणे हा राज्य सरकारचा अजेंडा आहे. यावेळी देशात महाराष्ट्र राज्य सर्वाधिक साखर उत्पादन करत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी हितासाठीच हा कारखाना नव्याने सुरु करण्यात आल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी यंदा दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. या साखर कारखान्यात यंदा साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच पर्यायाने इथेनॉल निर्मितीवर भर देखील या कारखान्याच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *