Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मनसे’ पक्षाचा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच “जे चाललंय ते सर्वच खपवून घेणार नाही” असा ट्विटरद्वारे दिला सरकारला सज्जड दमवजा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तरावरून आज डोंबिवलीतील मनसे पक्षातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी ‘ट्विटर’ द्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा मुहूर्त सापडलेला असताना आणि सरकार मंत्र्यांची यादी बनविण्यात व्यस्त असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र सरकारला ट्विटरद्वारे सज्जड दमवजा इशारा दिला आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. या पूर्वी मनसे आमदार पाटील यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता, तर आता त्यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.

कल्याण-डोंबिवली खड्ड्यावर काय बोलले मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील ?

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाटले, उलटे लावून झाले, तरी कामे अजून सुरू झाली नाहीत, असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतं आहोत. या मागची भावना व भूमिका कोणावर टीका करण्याची नाही, तर या कामाकडे लक्ष द्यावे अशी आहे. जिथे कामे झालेली नसतील तिथे आम्ही बोलणारच. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार, असा सज्जड दमवजा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीच आता राज्याचे मुख्यमंत्री असताना निदान जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे तरी भरले जावेत हीच अपेक्षा !

पाऊस जोरात होता, त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र तसे कुठे डोंबिवली – कल्याणमध्ये कुठेही झालेले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जात आहेत. इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यात मंत्रिमंडळ नाही, ४० दिवस झाले आता, दाद मागायची कुठे ? असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावत ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हेच आता मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत’, एव्हडीच अपेक्षा आहे अशी मागणी मनसे चे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *