Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्य सरकार बोलवणार लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंनाही देणार आमंत्रण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सारकरकर लवकरच लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावणार असून या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

कायदा हाती घेतल्यास..

गेल्या काही दिवसांपासून राज्यांत कायदा आणि सुव्यस्स्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कायदा हातात घेऊ अन्यथा कठोर कारवाई करू असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

वातावरण चिघळवण्यासाठी प्रयत्न सुरू..

गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलीसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच..

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन २०१५ आणि २०१७ मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *