Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रोज होणार वीजपुरवठा खंडित; राज्यात भारनियमन अघोषित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील नागपूर येथे अनेक भागांत दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू झाले आह़े. मागणीच्या तुलनेत तब्बल अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना वीज भारनियमनाच्या झळाही बसू लागल्या आहेत़.

मराठवाडा व प. महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत

मराठवाडय़ातील वीज मंडळाच्या औरंगाबाद, नांदेड व लातूर तीन परिक्षेत्रातील ५६६ फिडरवर सध्या सरासरी तीन तास भारनियमन होत आह़े नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक ३७१ फीडरवर सरासरी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होतो. औरंगाबाद शहरातील १६० फीडरवर सरासरी दोन तास वीजकपात केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्यांत दोन-चार तासांपासून ते दहा-बारा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात तर ७२ तासांत अवघा दीड तास वीज उपलब्ध होती.

वीजगळती अधिक असलेल्या भागांत भारनियमन

वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े त्याचा उत्तर महाराष्ट्रात मालेगावातील तीन लाख यंत्रमागांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील २४ हजार २०० पैकी १३०० फीडरवर (संचयक) सध्या अडीच ते तीन तासांचे भारनियमन सुरू आह़े त्यात महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारितील नागपुरातील २२१, कोकण विभागातील ४९०, पुणे विभागातील २३५ फिडरचा समावेश आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े शिवाय, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़े तसेच पुढे रमजान ईदही आहे. या सर्वाना भारनियमनाचा फटका बसण्याचे संकेत आहेत़. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी सुद्धा येत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *