Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रोहा येथील ४८ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन व गटवारी जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजता धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील संघ रोहा येथे दाखल झाले आहेत.

स्पर्धेसाठी पाच मैदाने बनविण्यात आली आहे. प्रकाशझोतात होणार्‍या सामन्यांचा थरार चार दिवस चालणार आहे. मुला-मुलींचे ४४ संघ, प्रशिक्षक, पंच व असोसिएशनचे पदाधिकारी दाखल होत आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सत्रात सोळा सामने होतील. त्यानंतर शुक्रवारी सकाळ आणि सायंकाळ सत्रात साखळी सामने होतील. ११ डिसेंबरला सायंकाळी अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. खो-खोचा थरार पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

खासदार सुनिल तटकरे, माजी क्रीडामंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील, श्री. कोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी मैदानाची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चोविस जिल्ह्यांचे संघ संचलन करणार आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन हाईल. यावेळी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव एड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, उद्योजक पुनित बालन, मधुकर पाटील, सुरेश लाड, श्रीमती उमाताई मुंडे, सुरेश मगर, विनोद पाशिलकर, माजी सचिव संदिप तावडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली असून ती पुढील प्रमाणे आहे

कुमार गट :
अ – गट : अहमदनगर, औरंगाबाद, सातारा.
ब – गट : उस्माबाद, धुळे, जळगांव.
क – गट : ठाणे, परभणी, बीड.
ड – गट : सांगली, रायगड, हिंगोली.
इ – गट : पुणे, मुंबई, जालना.
फ – गट : मुंबई उपनगर, नंदूरबार, लातूर.
ग – गट : सोलापूर, नाशिक, नांदेड.
ह – गट : रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग

मुली गट :
अ – गट : उस्माबाद, रायगड, नंदूरबार.
ब – गट : नाशिक, पालघर, परभणी.
क – गट : पुणे, धुळे, जळगांव.
ड – गट : ठाणे, जालना, बीड.
इ – गट : सोलापूर, मुंबई, हिंगोली. फ – गट : सांगली, मुंबई उपनगर, लातूर.
ग – गट : सातारा, रत्नागिरी, नांदेड.
ह – गट : औरंगाबाद, अहमदनगर,  सिंधुदुर्ग

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *