Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

गर्भाशयातील दीड किलो वजनाचा फायब्रॉइड काढण्यात वोकहार्ड हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश!

मिरारोड येथील वोकहार्ड हॉस्पिटल्समध्ये एका महिला रुग्णावर लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे झाली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स डॉ. राजश्री तायशेटे भासले स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे एका महिलेवर शस्त्रक्रिया करून दीड किलो वजनाचा 10 सेमी लांबीचा गर्भाशयाचा फायब्रॉइड यशस्वीरित्या काढण्यात आला.

ही 48 वर्षीय महिला रुग्ण बोईसर येथील रहिवासी आहे. तिच्या दोन्ही प्रसुती सी सेक्शनने झाल्या होत्या. मात्र तिच्या दुसऱ्या प्रसूतीनंतर तिला ओटीपोटात तीव्र दुखणे आणि मेनोरेजिया किंवा मासिक पाळीच्या दरम्यान असामान्य आणि जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु मागील अनेक शस्त्रक्रियांमुळे उपचार करण्यात जास्त जोखीम असल्यामुळे, रुग्णाला वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारारोड येथे पाठवण्यात आले.

डॉ. राजश्री तायशेटे भासले स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड माहीती देताना सांगतात की “रुग्णाला जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होत होत्या. तिची तपासणी केली असता गर्भाशय ग्रीवाचे फायब्रॉइड आढळून आले. एक टक्‍क्‍यांहून कमी महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. मूत्रवाहिनी (मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत मूत्र निचरा करणारी नळी) जवळ असल्यामुळे त्यांना कुशल शस्त्रक्रियेची गरज आहे. त्या महिलेला ऍनिमिया ही झाला होता. फायब्रॉइड तिच्या मूत्रमार्गावर दबाव आणत होता आणि तिच्या किडनीवर परिणाम करत होता. रक्त संक्रमण झाल्यानंतर तिची लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी करण्याचे ठरविले.
डॉ. तायशेटे पुढे म्हणाल्या की, या शस्त्रक्रियेदरम्यान, 5 मिमी कॅमेरासह 3 पोर्ट वापरण्यात आले ज्याला आम्ही मिनिमल पोर्ट आणि मिनिमल एक्सेस सर्जरी असे म्हणतो. ही एक डागविरहित शस्त्रक्रिया होती. गर्भाशय ग्रीवा आणि फायब्रॉइड्सला काढणे हे एक मोठे आव्हान होते कारण तिच्या मागील शस्त्रक्रियांमुळे ओटीपोटात चिकटपणा होता. मात्र प्रसंगावधान राखुन ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अखेर योनीतून दीड किलो वजनाचा 10 सेमी लांबीचा फायब्रॉइड काढण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांत रुग्ण घरी देखील परतला”

कोणत्याही असामान्य स्त्रीरोगविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी विशीनंतर स्त्रियांनी नियमित स्त्रीरोग तपासणी करुन घेणे महत्त्वाचे ठरते. तीव्र ओटीपोटात दुखणे आणि मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या रक्तस्रावामुळे मी चिंताग्रस्त झाली होती. मी पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवणे, गरम पेये पिणे, व्यायाम करणे, ताठ बसणे, आल्याचा चहा घेणे आणि भरपूर पाणी पिणे यासारखे अनेक घरगुती उपाय करून पाहिले. पण या सर्व गोष्टी मला वेदनांपासून मुक्त करण्यात अयशस्वी ठरल्या. मी जवळजवळ 8 वर्षे हा त्रास सहन केला. शेवटी, वेदना असह्य झाल्यावर मी तज्ज्ञांकडे धाव घेतली व तातडीने उपचार करून फायब्रॉइड काढून टाकल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी आता वेदनामुक्त आहे आणि माझी दैनंदिन कामे सहजतेने करू शकते. मी इतर महिलांना देखील शरीरातील कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि तत्काळ वैद्यकीय मदत घ्या असे आवाहन करत असल्याचेही या महिला रुग्णाने स्पष्ट केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *