Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

लालबावटा रिक्षा युनियनतर्फे शूरवीर आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या स्मृतीदिनी मोफत जेवण वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील सोनेरी पानावर ठसा उमटवणारे डोंबिवलीतील आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या २८४ व्या स्मृती दिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ च्या वतीने मोफत जेवणाचे वाटप बुधवारी दुपारी करण्यात आले. आन ठाकूर आणि मान ठाकूर यांचे वंशज जगदीश ठाकूर यांच्या हस्ते मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले.

यावेळी लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर, मधुकर माळी. कमलाकर पाटील, नितीन पाटील (भोपर गाव), हनुमान पाटील (पडले गाव), जयवंत पाटील (निळजे गाव) इत्यादी ग्रामीण भागातील आगरी समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील नागरिक उपस्थित होते.

पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी ३ मे १७३९ रोजी जुनी डोंबिवली गावातील सुपुत्र शूरवीर आन ठाकूर व मान ठाकूर यांच्यावर किल्ल्याचा बुरुज सुरुंग पेरून उडविण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा सुरुंगाच्या स्फोटात त्यांना वीरमरण आले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील आन ठाकूर व मान ठाकूर हे दोघे एक सोनेरी पान आहे. याचा डोंबिवलीकरांना अभिमान असल्याचे जगदीश ठाकूर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या शूरवीर बंधूंच्या स्मृतीदिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ यांच्यावतीने बुधवारी दुपारी मोफत जेवण जेवणाचे वाटप करण्यात आले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *