Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांना ‘ईडी’ कडून अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी & सीईओ) रवी नारायण यांना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ने अटक केली आहे.

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांचा यात सहभाग आहे का? याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू होती. यानंतर, अखेर असे समजते की ‘ईडी’ने फोन टॅपिंग प्रकरणी रवी नारायण यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत अटक केली आहे.

‘ईडी’ने यापूर्वी कथित फोन टॅपिंग प्रकरणात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ (एनएसई) चे माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. या प्रकरणांचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटाळ्यात अटक केली होती.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *