Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अतिवेगाने वाहन चालविल्याने गेल्या साडे तीन वर्षात ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महामार्गाने वाहन चालताना वेगावर नियंत्रण असणे अत्यावश्यक बाब असते. अनेकदा वेगवान वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्याने स्वतःसोबत इतरांचेही जीव धोक्यात घालण्याचा प्रकार घडतो परिणामी भीषण अपघात घडून मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार जवळपास ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू हा ७६ हजार अपघातांमध्ये झाला असून याला सर्वस्वी जबाबदार बाब म्हणजे अतिघाईने व वेगाने वाहन चालविणे होय.

नुकतेच सायरस मिस्त्री यांचे निधन वाहन अपघातात झाले होते, तत्पूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा सुद्धा मृत्यू महामार्गावर अपघातात झाला होता. काही महामार्ग हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून मुंबई – पुणे, अहमदाबाद – मुंबई, सोलापूर – पुणे, औरंगाबाद – मुंबई यासह औरंगाबाद – अमरावती इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. इथे विशेष बाब म्हणजे काही जागी रस्ते व्यवस्थित नाही परंतु चार ते सहापदरी मार्गावर देखील अपघातांची संख्या लक्षणीय आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वेगाला आवर न घालणे होय. केवळ महामार्गावरच नाही तर शहरी हद्दीत देखील सुसाट वेगाने व कुठलीही पर्वा न करता वाहन चालविणे अनेकांच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.

वाहन चालविताना नियम न पाळणे, घाईगडबडीने वाहन चालविणे, हेल्मेटचा तसेच सिटबेल्टचा वापर न करणे, स्वतःची लाईन सोडून वाहन चालविणे, ओव्हरटेक करण्याचा आततायी प्रयत्न करणे, अवजड वाहनांच्या दरम्यान सुरक्षित अंतर न राखणे इत्यादी बाबी अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या आहे. काही अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालाची लोडींग केलेली असते याशिवाय अतिवेग असल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतो जो स्वतःसोबत इतरांनाही हानी पोहचवतो. मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालविल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *