Latest News

मध्य रेल्वेच्या दादर – माटुंगा दरम्यान दोन एक्सप्रेसची धडक ! उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मुंबई रेल प्रवासी संघाची मागणी.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मध्य रेल्वेच्या दादर – माटुंगा स्टेशन दरम्यान उशिरा संध्याकाळी २१.४५ वाजता दोन एक्सप्रेसची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रेन क्र. ११००५ चे ३ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे कल्याण कडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात सध्या तरी कोणाला ही दुखापत झाली नाही असे वर्तवले जात असून नवीन अपघात विरोधक प्रणाली “Anti Collision Technology”  का अपयशी ठरली ? व ह्या अपघातामागील दोषी व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबईतील सगळ्यात मोठ्या आणि जुन्या प्रवासी संघटना यांनी केली आहे.

“मुंबईकरांचा” रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार ?

माननीय राम नाईक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र येऊन “मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन” ची निर्मिती केली. ह्या मागे मुंबईतील रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, त्यासाठी लागणारी जमीन हस्तांतरण लवकर व्हावे , रेल्वे अपघात कमी करणे आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा ही कारणे होती. केंद्र सरकारने आक्रमक पणे सगळ्या प्रकारे सहकार्य केले, माननीय सुरेश प्रभू , पियुष गोयल यांनी सढळ हस्ते मुंबईसाठी आर्थिक निधी मंजूर केला. तरीपण मुंबईकरांचे हाल कमी होण्या ऐवजी वाढतच आहेत.

मुंबई बाहेरून येणाऱ्या अधिकारी यांना मुंबईच्या समस्ये विषयी काहिही माहिती नसते. त्यांची कुशलता लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस चालवण्यात असते. हेच कारण मुंबईच्या प्रवाश्यांच्या मुळावर आले आहे.
नवीन ५-६ ट्रॅक बांधला लोकल रेल्वे साठी आणि चालवत आहेत मेल आणि एक्सप्रेस ??

करोडो रुपये खर्च करून नवीन ५-६ वा ट्रॅक बांधण्यात आला, मुंबईकरांच्या लोकल वेळेत चालवल्या जाव्यात म्हणून, परंतु अत्यंत चुकीची निर्णय क्षमता असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून जुने ३-४ ट्रॅक मेल आणि एक्सप्रेस साठी राखीव असूनही नवीन ट्रॅक वर मेल चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन ट्रॅक पूर्ण होऊनही मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. सध्याचे रेल्वे अधिकारी किती अकार्यक्षमपणे काम करत आहेत ह्याची उदाहरणे रोजच होणाऱ्या अपघातामध्ये दिसत आहे.

नाय जमत तर चालते व्हा !

कोणताही मोठा अपघात होण्या अगोदर अनेक छोटे अपघात होतात, आजचा अपघात हा मुंबईकरांसाठी डोळे उघडणारा आहे. मोठा अपघात होण्या अगोदर माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि माननीय रेल्वे राज्य मंत्री राव साहेब दानवे साहेबांनी त्वरित अश्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे मधू कोटीयन (अध्यक्ष) व सिद्धेश देसाई (जनरल सेक्रेटरी) हे करत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *