Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

वारंवार मेंदुचे झटके येणाऱ्या 72 वर्षीय महिलेवर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने स्कार एपिलेप्सी असलेल्या 72 वर्षीय महिलेला नवे आयुष्य दिले आहे.

ज्या रुग्णाला वारंवार मेंदुचे झटके येतात त्यांना उजव्या बाजूच्या वरच्या अंगात वारंवार मुंग्या येणे, अंग बधीर होणे, चिडचिड आणि अस्वस्थता होणे ही लक्षणे सुधारण्यासाठी रुग्णालयात त्वरित उपचार देण्यात आले. आता, रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि तिची दिनचर्या पुर्ववत झाली आहे.

मिरारोड येथील रहिवासी असलेल्या श्रीमती मिहिरा कुमारी या गृहिणीस अचानक उजव्या बाजूस वरच्या अंगाला मुंग्या येणे आणि उच्च रक्तदाबासह बधीरपणाची लक्षणे दिसू लागली. या रुग्णाला पुढील उपचारासाठी मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिचा जीव वाचला.

डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड सांगतात की, “रुग्णाला उजव्या वरच्या अंगात मुंग्या येणे आणि बधीरपणा जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर, तिला इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी) वर फोकल सेन्सरी सीझर आढळून आले. तिच्या मेंदूच्या एमआरआयमध्ये मेंदूच्या डाव्या बाजूला मागील भागात रक्तस्रावाचा एक डाग दिसून आला ज्यामुळे संवेदना होतात. तिला स्कार एपिलेप्सी असल्याचे निदान झाले. या रुग्णाच्या आधीच्या रक्तस्रावामुळे मेंदूतील डागामुळे मेंदूला इजा झाल्याचे दिसून आले”

डॉ. पै पुढे म्हणाले, “तिच्यावर इंट्राव्हेनसद्वारे दुसऱ्या अँटी-एपिलेप्टिकवर उपचार करण्यात आले, ज्यामुळे तिच्या संवेदनाक्षम झटक्यांमध्ये सुधारणा झाली. तिचे ईईजी सामान्य होते. म्हणून ऍन्टी-एपिलेप्टिकच्या तोंडावाटे औषध देण्यात आले. पण त्याच दिवशी, तिला चिडचिडेपणा आणि अस्वस्थतेसह हातपाय हालचालींसह सामान्यीकृत झटका आला आणि चक्कर आल्यानंतर ती दीर्घकाळ तंद्रीत होती. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर तिसरे इंट्राव्हेनस अँटी एपिलेप्टिक सुरू करण्यात आले. ईईजी पुन्हा करण्यात आले आणि त्यात काही बदल आढळून आले. सीटी ब्रेनमध्ये नवीन इन्फार्क्ट किंवा रक्तस्त्राव दिसून आला नाही. तिचे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) विश्लेषण सामान्य होते.”

9 नोव्हेंबर रोजी, तिला गुंगी येत असलाने औषधांमध्ये बदल करण्यात आला जेणेकरून तिला अधिक सतर्क राहता येईल. 10 नोव्हेंबर रोजी, ती अधिक सतर्क झाली आणि हात पाय हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णाला वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि 12 नोव्हेंबरला तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असता आणि वारंवार चक्कर येण्यामुळे कायमचे नुकसान झाले असते. तिला अँटी-एपिलेप्टिक्स नियमितपणे सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे आमच्या नव्याने सुरू झालेल्या एपिलेप्सी क्लिनिकमध्ये उपचारापूर्वी आणि उपचारानंतरच्या काळजीने रुग्णाला तातडीने व्यवस्थापित करण्यात आले. क्रिटिकल केअर, बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि त्वरित निदान यांसारख्या कौशल्यामुळे रुग्णावर एकाच छताखाली सहज उपचार करण्यात मदत झाली.

मला अचानक झटका आला, तो काही मिनिटांपर्यंत सून्न करणारा होता. उजव्या हाताला मुंग्या येणे आणि बधीरपणा यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाली आणि गोंधळ उडाला. त्यानंतर दोन दिवस काय झाले ते मला आठवलेही नाही. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर अशक्तपणामुळे मला नीट चालता येत नव्हते. याचा माझ्या जीवनमानावर परिणाम झाला. मला माझी रोजची कामे सहजतेने करता येत नव्हती. पण, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये वेळेवर दाखल केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबीयांचे आभार मानते. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी माझी सामान्य दिनचर्या पुन्हा सुरू केली असून कोणत्याही अडचणीशिवाय दैनंदिन क्रिया पुरेववत करू शकत आहे. आता मला मेंदुचे झटके येत नाहीत अशी प्रतिक्रीया रुग्ण श्रीमती मिहिरा कुमारी यांनी व्यक्त केली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *