Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केले सराईत मोटरसायकल चोरास जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथे दिनांक ०४.११.२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गांधी गार्डन, नगरसेवक श्री.शैलेश धात्रक यांच्या कार्यलयासमोर, दीनदयाळ रॉड, डोंबिवली पश्चिम येथून एक होंडा कंपनीची सी.डी. डीलक्स मोटरसायकल चोरी झाली म्हणून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. २५५/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलं होता. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना. लोखंडे यांच्याकडे आहे.

डोंबिवली परिसरात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप वाढल्याने नमूद गुन्ह्याचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री.गणेश वडने व पथक।यांना आदेशीत केले. नमूद गुन्ह्याच्या घटनस्थळाच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासले असता एका सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामध्ये दोन इसम गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल ढकलत घेऊन जात असल्याचे दिसून आले. नमूद इसमांची गुप्त माहितीदारांमार्फत ओळख पटवून एका इसमाला तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने त्याचे ठिकाण बदलत असताना व शेवट मोबाईल बंद असताना कौशल्यपूर्ण तपास करून पारोळा जळगाव येथून ताब्यात घेतले व त्या इसमाच्या मार्फतीने दुसऱ्या इसमास चिंचपाडा, कल्याण पूर्व येथून ताब्यात घेतला. नमूद दोन्ही इसमांकडे चौकशीअंती त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याचे कबुल करून मोटरसायकल हस्तगत केली तसेच आरोपी क्र.१ दिलीप शांताराम पाटील याने विष्णुनगर पोलुस ठाण्याच्या हद्दीत आणखी ५ गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून त्या हस्तगत केली आहेत. आरोपी क्र.२ नामे रोहित अविनाश यादव (वय ३१ वर्षे) याचा नमूद ऐका गुन्ह्यातच सहभाग दिसून येत आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री.दत्तात्रय कराळे सो, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, सहा पोलीस आयुक्त मा. श्री.जयराम मोरे सो, डोंबिवली विभाग व मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि श्री.गणेश वडणे, पो.शी भामरे, पो.हवा पाटणकर, पो.ना सांगळे, पो.ना लोखंडे, पो.शी मिसाळ, पो.ना कांगुणे यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *