Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हजारो वारकरी, टाळकरी आणि मृदुंगधारी यांच्या उपस्थितीत आज होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा हजारो वारकरी, टाळकरी आणि मृदुंगधारी यांच्या उपस्थितीत आज सात जून रोजी सायंकाळी दिवा येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बेतवडे माय सिटी मागे उसरघर गावाजवळ मानपाडा दिवा रोड येथे हे भवन होणार असून, सात जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे देखील या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासाठी आगरी कोळी आणि वारकरी भवन भूमिपूजन सोहळा समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या वतीने डोंबिवली येथे सोमवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत या विशेष भवनाची निर्मिती कशासाठी करण्यात येणार आहे याची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रमाकांत मढवी, जयेश महाराज भाग्यवंत , गणेश महाराज ठाकूर, राजेश मोरे,शरद पाटील, नितीश ठोंबरे, दीपेश म्हात्रे, गुलाब वझे, अर्जुन पाटील, महेश पाटील, नितीन पाटील, रवी मट्या पाटील, हनुमान महाराज, प्रकाश महाराज इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

या भूमिपूजन सोहळ्यासोबत पुरातन खिडकाळेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि दिवा भागातील विकास कामांचे व इतर कार्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आळंदी येथे चार वर्ष वास्तव्य करावे लागते. त्याचे विकेंद्रीकरण व्हावे व दूरस्थ प्रशिक्षणद्वारे व संगणक प्रणालीचा उपयोग करुन दृश्यात्मक प्रशिक्षण ‘गुगल’ किंवा ‘झूम’ मीटिंग द्वारे देण्यात येईल. यासाठी या भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. असे जयेश महाराज भाग्यवंत यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

आगरी समाजातील परंपरा, रुढी, संस्कृती यांचे जतन व्हावे व भविष्यात नव्या पिढीला वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता हे वारकरी भवन निर्माण करत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदर डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी आगरी कोळी समाजाच्या साठी अध्यात्मिक पवित्र वास्तू निर्माण करुण दिल्याबद्दल दिपेश म्हात्रे यांनी धन्यवाद दिले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *