Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हैद्राबादच्या भामट्याने उल्हासनगरातील पप्पू कलानीच्या भावाला घातला ४० लाखांना गंडा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर शहरातील माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भावाला हैद्राबादच्या एका भामट्याने ४० लाखांना गंडा घाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंडा घालणाऱ्या भामट्या विरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रीष्णाकांत फुलपाथरी (रा. श्रीपूरम कॉलनी, हैद्राबाद ) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार

माजी आमदार पप्पू कलानी यांचे बंधू नारायण बुधममल कालानी (वय: ७९ वर्षे) यांचे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागातील फर्निचर बाजारमध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे. तर आरोपी क्रीष्णाकांत फुलपाथरी हा हॉटेल मालक नारायण कलानी यांच्या बँकेचे आर्थिक व्यवहार गेल्या अनेक वर्षापासून विश्वासाने सांभाळत होता. त्यातच हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी आरोपी क्रीष्णाकांत याला हॉटेल मालक नारायण यांनी उल्हासनगर मधील २ बँकेत खात्यामधून ४० लाख ९७ हजार ३७५ हजराचे दोन धनादेश ३ ऑक्टोंबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान देऊन हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी दिले.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव

मात्र आरोपी नोकराने हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा न करता सदरचे धनादेश आपल्या व मित्राच्या खात्यात वळते करून मालकांची आर्थिक फसवणूक केली. दुसरीकडे नोकरानेच विश्वासघात करून आपली फसवणूक केल्याचे समजताच हॉटेल मालक नारायण कलानी यांनी २९ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन हैद्राबादला राहणाऱ्या क्रीष्णाकांत फुलपाथरी यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे ४० वर्ष कलानी परिवाराचे शहरात राजकीय व अनेक व्यवसायात वर्चस्व आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *