Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आयुक्त दिलीप ढोलेंच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मलनि:सारण विभागाची आढावा बैठक संपन्न!

मिरा भाईंदर: दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मलनि:सारण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मलनि:सारण विभागाचे उप-अभियंता अरविंद पाटील, दिपक जाधव, प्रफुल्ल वानखेडे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. शहरातील सर्व मलनि:सारण केंद्राची माहिती, सद्यस्थितीतील परिस्थिती आणि पावसाळ्यानंतर सुरु Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

सरकारने मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा! शिवसेनेच्या नगरसेविकेची मागणी!

संपादक: मोईन सय्यद/मिरा-भाईंदर प्रतिनिधी उत्तन,भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या महिन्याभरा पासून खाण्याजोगी मासळी जाळ्याला मिळत नसून अरबी समद्रात फक्त जेली फिशच जाळ्यात येत असल्यामुळे उत्तनचे मासेमार कोळी बांधव हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत मच्छीमार बांधव बेजार होऊन थकलेले आहेत त्यामुळे मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उत्तनच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी गंडोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर शहरातील दीड दिवसांच्या विसर्जन सोहळयात 7878 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप!

संपादक: मोईन सय्यद/मिरा -भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर श्रीगणरायाच्या 7878 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. महानगरपालिकेच्या वतीने मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी! जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी दिला आंदोलनाचा इशारा!

मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

दोन वर्षानंतर सुरू झालेल्या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा पाहिला दिवस गणवेश विना!

शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर, आयुक्तांनी पुष्गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत! मिरा भाईंदर: कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा बुधवार १५ जून रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मिरा भाईंदर शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे महापौर ज्योत्स्ना हसनाले व आयुक्त दिलीप ढोले यांनी महानगर पालिकेच्या इतर अनेक Read More…