Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

डॉक्टर्स डे निमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमांचे आयोजन

संपादक: मोईन सैय्यद / मिरारोड प्रतिनिधी

मुंबई: गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिले आहे. कोविड काळात डॉक्टरांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वॉक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. सुमारे १०० डॉक्टर्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कायर्क्रमातंर्गत समाजाप्रती नि: स्वार्थ सेवा दिल्याबद्दल डॉक्टरांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

मीरा रोडच्या वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सेंटर प्रमुख डॉ. पंकज धमिजा म्हणाले, डॉक्टर्स हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. या कठीण परिस्थितीत जेव्हा आपण सर्व आपल्या कुटुंबाविषयी आणि स्वतःबद्दल काळजी घेत असतो, तेव्हा मात्र डॉक्टर्स त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता अविरत रुग्णसेवा पुरविण्याचे काम करतात. डॉक्टरांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी या महामारीच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी रुग्णालयाने हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. कराओके, स्टँड-अप कॉमेडी अॅाक्ट्स आणि त्यानंतर चाट पार्टी अशा अनेक मनोरंजन कार्यक्रमात डॉक्टर सहभागी झाले होते. रूग्णांच्या रक्षणासाठी त्यांचे कौतुक करून त्यांना रौप्य पदकांनीही गौरवण्यात आले. त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच विशेष आभार देखील मानण्यात आले.

मीरारोड येथील वॉक्हार्ट हॉस्पीटलचे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश एल. भालेराव सांगतात डॉक्टर्स डे निमित्त आमच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. हॉस्पिटलद्वारे आयोजित सर्व उपक्रमांचा आम्ही पुर्णतः आनंद घेतला. यामुळे आम्हाला आमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढणे शक्य झाले आणि एकत्र येण्यास आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालविण्यास मदत झाली. साथीच्या आजाराच्या वेळी आम्ही आपली काळजी घेतली तशीच आमच्या सुरक्षेची काळजी हॉस्पीटलने घेतली यासाठी मी वोक्हार्ट हॉस्पीटलचे विशेष आभार मानतो

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *