Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कामा’ संघटनेच्या वतीने अपघातातील आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची प्राथमिक काळजी व उपाय योजना यासाठी सराव प्रात्यक्षिकेचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील एमआयडीसी येथे २०१६ साली ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेल्या स्फोटाला काळ उलटला तरी त्या अपघातात सापडलेल्या अपघाती लोकांना सरकारकडून अध्याप मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती असताना पुन्हा अश्या दुर्घटना होऊ नयेत व झाल्यास काय उपाय योजना व कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची काळजी ‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’ (कामा) संघटने च्या वतीने आपत्कालीन वाहीका नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. ही वाहीका योग्य पद्धतीने काम करते की नाही हे पाहण्यासाठी कामा संघटना आणि औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने घेतली असून सराव प्रात्यक्षिकेचे अर्थात ‘मॉकड्रिल’ चे आयोजन करण्यात आले होते.

 

मात्र यावेळी पाण्याचे टँकर उशिरा येणे, रुग्णवाहिका उशिरा पोहोचणे या त्रुटी जाणवल्यामुळे खरी घटना घडेल त्यावेळी या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी कल्पना आली असून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू अशी माहिती प्रशासकीय औद्योगिक सुरक्षा कल्याण सह-संचालक विनायक लोंढे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

डोंबिवली एमआयडीसी येथील परिसर नेहमीच वादाच्या चर्चेत असतो. या परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने घडत असतात. यापैकीच एक आठवणीत ताजी राहणारी दुर्घटना म्हणजे ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेला बॉयलर चा स्फोट. कंपनीत लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला होता आणि अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ‘मेट्रोपॉलिटन कंपनी’ मध्ये देखील अशाच प्रकारची आग लागली होती. मात्र सुदैवाने त्यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. आपत्कालीन वाहीका सुरू केली असून यामध्ये जनरेटर , ऑक्सिजन, फर्स्टएडबॉक्स, स्ट्रेचर्स, मोठेमोठे पाईप, आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा फोम आधी गोष्टींची सुविधा या वाहीकेमध्ये उपलब्ध केली आहे. ही वाहिका नेमकी कशा पद्धतीने कार्यरत आहे हे बघण्यासाठी त्यांनी गुरुवारी दुपारी सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) केले.

औद्योगिक विभागातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील खुल्या जागेत आग लावण्यात आली. आगीमध्ये नाट्य सदृश्यतील काही घायाळ जखमी कामगारांवर प्रथमोपचार व आगीवर नियंत्रण करण्याची तसेच कंट्रोल सेंटर आणि ऑनसाइट अत्यावश्यक वाहन यांच्यासह पाणी आणि पंपच्या माध्यमातुन त्याचा वापर करून आग विझवणे व जखमींना इमर्जन्सीची परिस्थिती कशी हाताळावी व रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवायची याची सुद्धा प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली. यामध्ये वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे निदर्शनास आले. या आधी देखील अनेक वेळा वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा समिती कल्याणचे सह-संचालक विनायक लोंढे यांनी आहे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असून वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत कशी उपलब्ध करता येईल या संदर्भात कामा संघटनेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आल्यामुळे हे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगीची घटना तसेच वायुगळती अश्या आपत्कालीन परिस्थितीला प्राथमिकता कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबी होऊन कसे सामोरे जाता येईल व परिस्थिती कश्या प्रकारे आटोक्यात आणता येईल यासाठीच मॉक ड्रिल म्हणजेच सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. या प्रत्यक्षिका मध्ये दुर्घटना होऊन आग लागल्यास ती विझवण्या प्राथमिकतेने घ्यावयाच्या काळजीबद्दल काही प्रात्यक्षिके दाखवली गेली. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने त्याच्यामध्ये जे होणारे अपघात आहेत त्याच्यावर उपाय योजना काय आहेत आणि कशाप्रकारे हे अपघात कमी करता येतील यांच्यासाठी मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले व घेतलेल्या सराव प्रात्यक्षिकाने समाधानी असून राहिलेल्या उर्वरित त्रुटींची लवकरच पूर्तता करून पुन्हा असेच सराव प्रात्यक्षिक करू असे ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *