Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

मेलद्वारे शिवीगाळ आणि ‘मुंबई विद्यापीठ’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई विद्यापीठ बॉम्बस्फोट घडवून उडवू अशी धमकी अज्ञाताकडून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षांच्या निकालांचे कामकाज सुरु आहे. अज्ञाताकडून मुंबई विद्यापीठाला बी.कॉम चे निकाल लवकर लावा यासाठी शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाला १०, ११ , १२ ऑगस्ट या तारखांना धमकीचे मेल आले आहेत. मुंबई विद्यापीठाने धमकीचे मेसेज प्राप्त झाल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. विद्यापीठाच्या तक्रारीनुसार सायबर पोलीसांनी तपास सुरुकेला आहे. काही दिवसांपुर्वी मंत्रालयात बॉम्ब स्फोट घडवण्याबाबत फेक कॉल करण्यात आला होता.

मुंबई विद्यपीठात परीक्षांच्या निकालांबाबतचं कामकाज सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांचे निकाल रखडले आहेत. अज्ञात व्यक्तीने निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल केला आहे. या धकमीच्या मेलमध्ये अज्ञाताने बी.एस.सी, बी.ए व बी.कॉम या कोर्सेसच्या अंतिम म्हणजेच ६ व्या सेमिस्टरचे निकाल लवकरात लवकर लावले नाही तर मुंबई विद्यापीठ बॉम्ब स्फोटने उडवून टाकू अशी धमकी दिली आहे. या मेलमध्ये बॉम्ब स्फोटाची चित्रे पाठवून धमकी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या इमेल आयडीवरील आलेले मेल तपासत असताना अज्ञात व्यक्तीने १०,११ आणि १२ तारखेला धमकीचे मेल पाठवल्याचे सापडले आहे. या मेलमध्ये निकाल लवकरात लवकर लावा असे म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीसांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *