Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

BREAKING NEWS! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणातुन संन्यास; खासदारकीही सोडणार.. भाजपला मोठा धक्का!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम ठोण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी “मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो व आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे” असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही काळापासून बाबुल सुप्रियो नाराज होते. यामुळे ते मोठा निर्णय घेतील असा अंदाज बांधला जात होता. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. पश्चिम बंगालचे असल्याने बाबुल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येही जाण्याची शक्यता होती. परंतू बाबुल यांनी आज राजकारणाचं सोडण्याची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे काम करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी या मागचे कारण गुलदस्त्यात गुप्तरीत्या ठेवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपामध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होती. बाबुल काहीतरी मोठा निर्णय घेतील असे बोलले जात होते. यावर बाबुल सुप्रियो यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पक्षासोबत माझे काही मतभेद होते. निवडणुकीच्या आधीच ते साऱ्यांसमोर आले होते. पराभवाची मी जबाबदारी घेतो, परंतु त्यासाठी बाकीचे नेते देखील जबाबदार आहेत, असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

बाबुल यांनी म्हटले की, पक्ष सोडण्याचा विचार मी बऱ्याच काळापासून करत होतो. राजकारण सोडण्याचे आधीपासूनच मन बनविले होते. मात्र, जे.पी नड्डा यांनी रोखल्यामुळे मी तो निर्णय मागे घेतला होता. आता काही नेत्यांबरोबर मतभेद वाढू लागले होते आणि वादही समोर येत होते, यामुळे मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.

बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते सांगितले आहे. तसेच भाजपसोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझा पक्ष भाजपाच होता आणि राहील असे म्हणत ज्यांना जे समजायचे आहे ते समजून जातील, असे सूचक वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे बाबुल सुप्रीयो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळले होते.

मला कोणत्याही पक्षाने फोन केलेला नाही, मी कुठेही जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस किंवा सीपीआयएम, कुठेच नाही. मी नेहमी एका टीमचे समर्थन केले आहे. मी अमित शहा आणि जे.पी नड्डा यांना राजकारण सोडण्याचे सांगितले आहे. मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतू कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतलेले नाही.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *