गुन्हे जगत

अनैतिक संबंधांतून रिक्षाचालकाची हत्या, महिला पोलीस असलेल्या पत्नीनेच दिली सुपारी!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीचा सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात घडली असून या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबलनेच आपल्या पतीचा खून करण्यासाठी पोलीस असलेल्या प्रियकराला सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी महिला पोलिसासह पाच जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुंडलिक आनंदा पाटील (वय-३० रा. पोलीस कॉलनी, रुम नं. ७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाटील यांच्या पत्नी वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मयत पुंडलिक पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. पाटील यांच्या पत्नीचे वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातून तिने पतीचा खून केला.

पोलिसांनी महिला पोलीस, तिचा प्रियकर आणि प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तिघांना अटक केली आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी मनोर येथे ढेकाळे परिसरात पुंडलीक यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. या गुन्ह्यात मिळालेल्या विविध माहितीच्या अनुषंगाने या पथकांनी पाच जणांना विविध ठिकाणाहून अटक केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *