आपलं शहर महाराष्ट्र

एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची पाहणी केली. हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम मधील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.

कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टीच्या काळात कोसळून दुर्घटना होण्याचा संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी अथवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.

तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज एनडीआरएफचे टिम बरोबर आम्ही पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्‍डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल याची तयारी करण्यासाठी आज आम्ही कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये एनडीआरएफच्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *