अवधूत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करणे बाबत माननीय आयुक्तांना नुकतेच मनसे तुन शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसैनिक राजेश कदम यांनी मागणी केली आहे सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून डोंबिवलीतील सावळाराम क्रिडा संकुल येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरून गेलेले आहे त्यामुळे डोंबिवलीतील रुग्णांना सध्या कल्याणला वर्ग करावे लागते मधल्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आल्यामुळे हळूहळू महानगरपालिकेचे इतर कोविड सेंटर हे बंद करण्यासाठी घेतले होते त्या अनुषंगाने पाटीदार भवन येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे सुद्धा जवळजवळ बंद करण्यात आले होते परंतु आता रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सदर पाटीदार भवन कोविड केअर सेंटर हे पूर्ववत सुरु करावे अशी मागणी शिवसेनेकडून होते आहे.
Related Articles
कल्याण जिल्हा भाजपा तर्फे परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचावेत व सामाजिक समरसता सर्वांगी रुजावी याकरिता बाबासाहेबांनी केलेले काम जगातील सर्वात लोकशाही मोठी असलेल्या देशाचे लिहिलेले संविधान कायदा हा सर्वात Read More…
शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या खेळीला ‘जशास तसे’ असे चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीला सुरुंग लावत राज्यात भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं. या सर्व सत्तासंघर्षापासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राजकीय Read More…
५५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज Read More…