Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

अपघातात पाय चिरडलेल्या ३३ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय वाचविण्यात वोकहार्डच्या डॉक्टरांना आले यश!

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: ऑफिसमधून घरी परतताना गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात हँडलबारवरून हात निसटल्याने ३३ वर्षीय महिला बसच्या चाकाखाली आली. तिचे दोन्ही पाय चाकाखाली आल्याने त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशावेळी प्रसंगावधान राखत मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक सर्जन डॉ श्रद्धा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने यशस्वी उपचार करुन या महिलेचे प्राण वाचविले.

33 वर्षीय महिला किंजल शाह या ऑफिसमधून घरी परतत होत्या. गर्दीच्या बसमध्ये चढत असताना तिचा हात हँडलबारवरून निसटला आणि ती अचानक बसच्या चाकाखाली सापडली. त्यानंतर ड्रायव्हरने तातडीने बस थांबवली आणि तिच्या सहप्रवाशांनी तिला पटकन बाहेर काढले. तिच्या दोन्ही पायांवर बसचे चाक गेले होते, त्यामुळे तिला तातडीने मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिरावल्यानंतर एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये तिच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे तिच्या मांड्या आणि पायांवरील त्वचा आणि स्नायू पूर्णपणे चिरडले गेले होते आणि 800 मिली पेक्षा जास्त रक्तस्राव झाला होता.

 

डॉ श्रद्धा देशपांडे पुढे सांगतात की, रुग्णाला तात्काळ शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी नेल्यानंतर, नेक्रोटिक टिश्यू काढून टाकण्यात आले आणि विशेष थेरपी देण्यात आली. रक्त संक्रमण तसेच प्रतिजैविक देण्यात आले. खालच्या अंगांची पुनर्बांधणी करण्यासाठी तिच्यावर 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यादरम्यान अतिदक्षता विभागाने तिचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले. त्वरित उपचारामुळे रुग्ण पूर्णपणे बरी झाली आणि तिला अपघातानंतर महिनाभरातच घरी सोडण्यात आले.

डिग्लोव्हिंग जखमेवर त्वरीत उपचार करणे महत्वाचे आहे कारण यामध्ये त्वचा सोलवटली गेल्याने ऊतींचे नुकसान होते. अशा जखमा दुर्मिळ असतात आणि वेळेत ओळखल्या नाहीत तर गंभीर संसर्ग, सेप्सिस होऊ शकतो आणि ते जीवघेणे ठरु शकते. जखमांवर वेळीच उपचार केल्याने जलद पुनर्प्राप्ती होते.

डॉ श्रद्धा देशपांडे पुढे सांगतात की, रुग्णाने दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे. आता तिच्या शरीरीवल चट्टे दूर करुन त्याचे व्यवस्थापन केले जात आहे.

मिरारोडचे वोक्हार्ट हॉस्पिटल्स हे अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपचार प्रदान करते. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि तज्ञांच्या टीमचा सहभाग असलेल्या या हॉस्पिटलमध्ये त्वरित आणि अचूक उपचार मिळतात. प्राथमिक मूल्यांकनापासून ते ट्रॉमा सर्जरी आणि गंभीर परिस्थितीतील व्यवस्थापन यासारख्या प्रगत उपचारांपर्यंत सर्वसमावेशक आणि विशेष काळजी यावर भर दिला जातो. प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करत गंभीर परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालय सदैवर तप्तर असल्याचेही डॉ श्रद्धा देशपांडे यांनी स्पष्ट केले.

नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही ॲाफीसवरुन घराच्या दिशेने प्रवास करत होती. बसमध्ये चढली तेव्हा मला एक भयंकर अपघात होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. बसच्या चाकाखाली माझे हातपाय चिरडले गेले आणि पुन्हा कधीही चालता येणार नाही या विचारानेच माझ्या पायाखालची जमीन सरकली. अनेक शस्त्रक्रियांद्वारे रुग्णालयातील कुशल टीमने माझे पाय तर वाचवलेच पण मला पुन्हा हालचाल सक्षम केले. आज मी माझ्या पायावर उभी राहू शकते. डॉक्टरांच्या या सर्व टीमची मी सदैव ऋणी आहे ज्यांनी मला नव्याने आयुष्य दिले अशी प्रतिक्रिया रुग्ण किंजल हिने व्यक्त केली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *