संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जळगाव मध्ये धरणगाव येथे नेमणूकीस असलेला पोलीस नाईक विलास सोनवणे याने लाचेची मागणी केल्या प्रकरणी अॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता फिर्यादीस शिक्षा होणार नाही अशा पद्धतीने कागदपत्र तयार करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात १९ हजार रुपयांची विलास सोनवणे याने लाच मागितली होती.
या प्रकरणी पोलीस नाईक विलास सोनवणे याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता. पोलीस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दि.८ मार्च २०२१ रोजी भाग ५ गु.र.न. ११९/२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ व भा.द.वि. ३९२, २०१, १८६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस नाईक विलास सोनवणे फरार होता. दि. २७ मे रोजी एसीबी जळगाव युनीट मधील धडाकेबाज पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगांव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांनी आपले कौशल्य वापरुन फरार पोलीस नाईक विलास सोनवणे यास शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून ताब्यात घेत वरिष्ठांसमक्ष हजर केले.पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.