विदर्भ

अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) तर्फे नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोज 14 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणार!

नागपूर, प्रतिनिधी : पारंपरिक पद्धतीच्या शेती बरोबरच पुरक शेती देखील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते याचे महत्त्व लक्षात घेऊन माजी विधानपरिषद आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी त्यांच्या नागपूर येथील अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) येथे, ‘काळीमिरी, महुगुणी, बांबू, ऊस, धान, गहू, तूर, मूग, अळशी, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, एरंडेल यांची नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात’, विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार असतील. तसेच या कार्यक्रमास माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे व आमदार आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहील.
त्याच बरोबर भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम एन वेणूगोपाल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतील.

काळी मिरी, महुगुणी व अन्य विशिष्ट मसाल्यांचे पिक घेतल्याने, विदर्भातील शेतकऱ्यांना कसा जास्त फायदा होऊ शकेल व त्याच्या लागवडी पद्धतींबद्दल ते विशेष मार्गदर्शन करतील. सोबतच भारतीय वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सलीम सय्यद बांबू लागवडीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या प्रयत्नातून आकारत असणाऱ्या नॅच्युरल फार्मिंग बद्दल हेमंत चव्हाण, SPNF तज्ञ मार्गदर्शन करतील.

या निमित्ताने पंचक्रोशीतील सरकारी कृषी अधिकारी व महसूल विभागातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच हे सदर महत्वाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे उपस्थित असतील. येत्या १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सदर शिबिर, अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF), छत्रपुर, गाव सराखा बोर्डा, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे संपन्न होणार असून मुझफ्फर हुसैन यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारा हा कृषी विशेष कार्यक्रम निश्चितच शेतकरी-कास्तगारांना अत्यंत महत्वपूर्ण उपलब्धी ठरणार असून शेतकरी आणि शेतीशी संबंधित असलेल्या नागरिकांनी या मार्गदर्शन शिबिरास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले शेतकरी व कास्तगारांनी अस्मिता हाऊस, श्रीमती शांती सलोनी यांच्याशी 02228111185 या फोनवरून संपर्क साधावा तसेच व्हॉट्सअप/SMS करिता +919324558593 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नरेंद्र जिचकार यांचेशी 9850363244 या क्रमांकांवर नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *