गुन्हे जगत

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार! आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार.. आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली)

महिलांच्या सुरक्षितेकरता रेल्वे प्रशासनाने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. महिलांच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असल्यास चोरीचे प्रकार होत नाहीत. परंतु महिलांच्या डब्यात पोलीस नसल्याने याचा फायदा चोरटे घेत आहेत. लोकल फलाटावर आल्यावर महिलांच्या डब्यात शिरून महिलेच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून चालू गाडीतून उडी मारून पसार झाल्याची घटना आंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी १० तारखेला ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ठाणे येथील वैशाली नारायण घरत (२१) या १० तारखेला सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आसनगाव ते कल्याण असा अप सीएसटी लोकल गाडीचे गार्ड बाजूकडील दुसरे वर्गाच्या महिलांच्या डब्यातून बसून प्रवास करत होत्या. लोकल आंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्र.२ वर सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास थांबली असताना अनोळखी इसमाने सदर डब्यात चढला. त्याने फिर्यादीच्या डाव्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून चालू लोकल गाडीतून फलाटावर उडी मारून पसार झाला. या घटनेमुळे महिलाच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असावे अशी मागणी होत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.