Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या अट्टल दाखलेबाज गुन्हेगारास गुन्हे शाखा घटक-३, कल्याण पोलीसांनी शिताफीने केले जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या अट्टल दाखलेबाज गुन्हेगारास कल्याण घटक-३,च्या गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पोलीस स्टेशन येथे दि.२२.०८.२०२२ रोजी गुन्हा रजि. नं ३०३/२०२२ भादंवि कलम ४५४, ३८० खाली दाखल करण्यात आला होता व नमूद गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३, कल्याण चे पोलीस करत होते.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळा वरून सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे तपास करत असताना आरोपी सद्यस्थितीत मुंब्रा येथे असल्याचे पोलीसांना आढळून आले. पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा परिसरात शोध घेत असताना भोलेनाथ नगर, मुंब्रा जवळ येथून अब्रार अकबर शेख (वय: २४) या गुन्हेगारास सापळा रचत अटक केली. सखोल चौकशी अंती सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

सदर चोरीच्या प्रकरणी त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालापैकी ५५,०८०/- रु. रोख रक्कम व ५,०००/- इतर साहित्य तसेच वापरत असलेला मोबाईल १०,०००/- रु. किंमतीचे १ मोबाईल हँडसेट असा एकूण ७०,०८०/- रु. किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच सदर गुन्हेगारास पुढील कारवाईसाठी व तपासासाठी डोंबिवली पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे. सदर आरोपी विरोधात यापूर्वी नागपाडा, आगरीपाडा, मुंब्रा, कळवा, नयानगर, डी.बी.मार्ग, जे.जे.मार्ग, अलिबाग, पेण, एन.एम.जोशी मार्ग व विष्णुनगर पोलीस ठाण्यात जवळपास २५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय माळी, पोहवा सचिन शिंपी, सचिन साळवी, अनुप कामत, वसंत बेलदार, साबळे, विलास कडु, सचिन वानखेडे, महिला पोहवा मेघा जाने, पोशि विनोद चन्ने, मिथुन राठोड व उमेश जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *