संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हल्ली चांगलेच चर्चेत आहे, नुकत्याच राज्य अधिवेशनात झालेल्या घोषणाबाजी, सत्ताधारी-विरोधक धक्काबुक्की प्रकरणात अमोल मिटकरी हे अग्रणी होते. आता मिटकरी यांनी सूचक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची जणू खुली ऑफरचं दिली आहे. नुकत्याच केलेल्या भाष्यात मिटकरी म्हणाले की, भाजप हा असा पक्ष आहे जो पक्ष वाढविणाऱ्यांचे पंख छाटण्याचे कार्य करतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश करावा. नेमका हा प्रकार रोहिणी खडसे यांच्या लक्षात आला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ खडसे व गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष राज्यात मजबूत झाला आहे, परंतु त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. यामुळे रोहिणी खडसे जश्या वेळीच सावध झाल्या, नेमके तश्याच प्रकारे पंकजा मुंडे यांनी देखील भूमिका घेत राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा. मिटकरी यांच्या विधानावर पंकजा मुंडे व अन्य भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.