संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन, या क्लबची स्थापना २८ वर्षांपूर्वी झाली आणि तेंव्हापासून हा क्लब सतत समाजोपयोगी काम करीत आला आहे.
असाच एक समाजोपयोगी आरोग्य सेवा देणारा उपक्रम म्हणजे ”रोटरी हेल्थ सेन्टर”. हा फेब्रुवारी २०२० मध्ये रो. संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेत्रूत्वाखाली व रो. अनिल हीरावत यांच्या संकल्पनेने ह्या क्लबने ३०० स्क्वे. फूट च्या छोट्या जागेत सुरु केला. याला गरजु लोकांचा भरघोस प्रतीसाद मीळाला. या सेंटरमधे पॅथॉलॉजिकल,डायग्नोस्टिक, डेंटल सर्व्हिस, ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर , तसेच जनरल ओपीडी या सेवांचा वाजवी दरामध्ये समावेश आहे.
कोविड च्या साथीमध्ये सुद्धा या सेंटरने भरघोस कार्य केले. आरोग्य सेवेची तीव्र गरज लक्षात घेऊन यावर्षीचे क्लबचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे रोटरी हेल्थ सेंटरच्या विस्ताराला प्राधान्य देण्याचे ठरविले आणि रोटरी हेल्थ सेंटरच्या कमिटी मेम्बर्सनी ही हा उपक्रम उचलून धरण्याचे मान्य केले आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे सर्व कमिटी तसेच इतरही सदस्य कामाला लागले आणि आता छोट्या जागेतून हे सेन्टर १२०० स्क्वे. फूट च्या मोठ्या जागेत स्थलांतरित झाले आहे.
या कामी कमीटी सदस्य संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, रो.अनील हीरावत, रो.अजय कुलकर्णी, रो.जीतेंद्र नेमाडे, रो.डॉ.लीना लोकरस, रो.गुलाब पावळे, रो.संदीप खापरे ह्यांचे सहकार्य लाभले आहे.
आता विस्तारीत सेवेमधे वरील सेवेसोबतच डेंटल,फिजिओथेरपी आणि पुढील काळात डोळयांचा दवाखाना, मेडीकल ऊपकरणे ईत्यादी आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार असून आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आता जागेची अडचण दूर झाल्याने आणि ह्या सर्व सेवा वाजवी शुल्कात उपलब्ध झाल्याने अधिकाधिक नागरिकांना ह्याचा लाभ घेता येईल. तसेच वरील उपचारासाठी अतिशय निष्णात डॉक्टर ही येथे कंन्सल्टंट म्हणून लाभणार आहेत.
या विस्तारीत नवीन जागेचे दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मयुरेश वारके यांच्या हस्ते उद्घाटन झाले व माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर हे उपस्थित होते.डोंबीवली मीडटाऊनचे सदस्य, डोंबीवलीतील इतर रोटरीचे सदस्य तसेच परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास ऊपस्थीत होते.