Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टकडून मुंबईत विविध ठिकाणी बसवणार १८८ ‘एईडी मशिन्स’

हदयविकाराबात जनजागृती करण्यासाठी “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने रविवारी “दिल की बातें” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “ट्यूनिंग फोल्क्स” नावाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा समूहाने खास निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ८८ रेल्वे स्थानक आणि १०० मेट्रो स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी निधीची व्यवस्था करणे आणि १८८ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AEDs) स्थापित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AEDs) मशीनचा वापर हा अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांना त्वरीत सीपीआर मदत मिळावी यासाठी केला जाणार आहे. ही उपकरणे एखाद्याला जीवघेण्या परिस्थितीतून वाचवून त्या व्यक्तीच्या हदयाचे कार्य सुरळीपणे पार पाडण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळण्यापुर्वी एईडी मशीनद्वारे हृदयविकाराची समस्या असलेल्या व्यक्तीला त्वरीत वैद्यकिय मदत पुरविली जाते.

सार्वजनिक ठिकाणी जनजागृती जसे की, विमानतळ, शॉपिंग मॉल्स, शाळा आणि क्रीडा सुविधांमध्ये मोहिम आणि उपक्रमांमुळे आणि एईडी मशीन्सची संख्या वाढत आहे. या उपकरणांचा वापर आणि त्याच्या कार्यातील सुलभता यामुळे जवळच्या व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवरमध्ये वेळीच उपचार मिळविणे शक्य होते. सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) आणि गंभीर परिस्थितीत एईडी मशीनद्वारे उपचारामुळे अधिक जीव वाचविणे शक्य होत आहे.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय मेहता म्हणाले की, सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत एईडी मशीनचा वापर केला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करुन देण्याचा वैद्यकिय तज्ज्ञांचा प्रयत्न सुरु आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि एईडी मशीनची उपलब्धता आणि वापर हा अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरीकांमध्ये जगण्याचा दर वाढवण्यासाठी आशेचा किरण ठरत आहे.

डॉ. मेहता म्हणाले की, एईडी हे ऱ्हदयविकारासंबंधीत आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे जीव वाचवणारे उपकरण आहे जे हृदयाला कार्यरत करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. रोटरी क्लबने याआधीच सुमारे १० एईडी मशीन दान केले आहेत. या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील ८८ उपनगरीय रेल्वे स्थानके आणि १०० मेट्रो स्थानके यांसारख्या आणखी १८८ ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करुन देण्याचे आमचे ध्येय आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *