संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळे समोरील पेंडसे नगर तीन रस्ता प्लाझ्मा रक्तपेढी जवळील यादव डेअरी येथे शिवसेना दसरा मेळाव्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. काही अज्ञात इसमाने खोडसाळपणाने शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोटो असलेला भाग धारदार वस्तूने फाडला आहे. गुरुवारी ६ आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर घटना घडल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश श्यामराव तेलगोटे यांनी केली आहे.
रामनगर येथील डोंबिवली पोलीस स्टेशन यांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या अनुषंगाने अज्ञात इसमा विरुद्ध धारा ४२७ प्रमाणे एनसीआर दाखल करून घेतला आहे. सदर घटनेबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांना कळविण्यात आले असल्याचे प्रकाश तेलगोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.