संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सिंधुदूर्ग जिल्ह्यात सकाळपासून कणकवली व कुडाळ परिसरासह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत आलाय.
मागील चार ते पाच महिने मेहनत घेऊन पिकवलेलं भात शेतीचे पीक आता कापणीसाठी परिपक्व झालं असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चितींत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे निघून जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ही अधून मधून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडून शेतीतील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड, ठाणे, नागपूर आदी जिल्ह्यात ही अधून मधून पाऊस पडत आहे.