संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नफा मिळवून देण्याचे बहाण्याने आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या अनिल पेदुरी आणि कुंजन शहा यांना विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे.
मोबाईल नंबर वरून दोन वेग-वेगळ्या फिर्यादी अभिषेक कामत यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैशाची गुंतवणूक करण्यास सांगून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून रोबो टेंडरला रक्कम जमा करा असे सांगून फिर्यादीची ४,५०,००० रुपये फसवणूक केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सुरत या ठिकाणाहून अनिल पेदूरी यास अटक केली गेली आहे.
तसेच कुंदन शहा याने फिर्यादी महिलेचे इंस्टाग्राम वर खोटे अकाऊंट तयार करून त्याद्वारे फिर्यादी महिलेच्या सासरच्या लोकांच्या मोबाईल नंबर वर आणि सदर इंस्टाग्राम वर फिर्यादी महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून फिर्यादीची बदनामी केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून वडोदरा गुजरात या ठिकाणी सापळा रचून कुंदन शहा यास अटक केली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ-३ कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी मोरे डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुलदिप मोरे, पोना पवार, पोशि के.ए.भामरे यांनी केली आहे.