मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात.
अशा या परिचारिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वॉक्हार्ट रूग्णालयाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक वर्ष रूग्णालयात अविरतपणे काम करत आपले कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकांना सोन्याची नाणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.