इम्रान खान, नांदेड प्रतिनिधी : नांदेडचा जिल्ह्यातील उमरी तालुक्याचा भूमिपुत्र असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर श्रेयस देशपांडे याने आपली अंगभूत कला जोपासत आपल्या आणखी एक “सासो में तुम” या संगीत अलम्बमची आपल्या चाहत्यांना “व्हॅलेंटाईन डे” निमित्त भेट दिली आहे.
मूळ उमरी जि. नांदेडच्या असलेल्या या भूमीपुत्राने आजवर संगीत क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याचे आजवर प्रसिध्द झालेल्या संगीत अल्बम मध्ये या नवीन अल्बम ची भर पडली. पुण्यातील झील इन्स्टिट्यूटच्या संगीत डिपार्टमेंटचा कल्चर हेड असलेल्या श्रेयसचे आजपर्यंत अनेक अल्बम प्रदर्शित झाले. बेधुंद मी, साथ असताना तू, सेहमासा, पुण्यातील लव्हस्टोरी आणि मागच्या काही महिन्यांपूर्वीच यु ट्यूब वर रेकॉर्ड ब्रेक केलेला “पता है” च्या प्रदीर्घ यशानंतर आता “सासो में तुम” हा अल्बम प्रदर्शित होतोय ही त्याच्या चाहत्यांसाठी खुप आनंदाची बाब आहे.
श्रेयसचे पुण्यात स्वतःचे दोन स्टुडिओ आहेत. झील इन्स्टिट्यूटचे झील रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि झील मीडिया हाऊस. श्रेयसचे पुण्यात लाईव्ह कार्यक्रम होत असतात. तो एक प्रतिभासंपन्न असा उमलता गितकार आहे. हिंदी आणि मराठी अशी अनेक गाणी त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली आहेत. त्याच सोबत अनेक विविध मराठी मालिकांना आणि चित्रपटाला त्यांनी संगीत देखील दिलेलं आहे. आणि अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
झील कॉलेजचे सर्वेसर्वा संभाजी काटकर सर यांचा आणि झील कॉलेजचे शिल्पकार जयेश काटकर सर यांचा श्रेयसच्या यशात सिहांचा वाटा आहे. याचसोबत झील कॉलेजचे डिरेक्टर प्रदीप खांडवे सर यांचे मार्गदर्शन आणि उत्तम साथ श्रेयस यांना नेहमीच असते.
या क्षेत्रात उत्तरोत्तर त्याच यश वाढत जावो. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असल्याने त्यांनी या शुभमुहूर्तावर हा अल्बम प्रदर्शित करण्याचे ठरवले.
सासो में तुम ह्या अल्बम चे गीत, संगीत, संगीत संयोजन आणि निर्माता श्रेयस देशपांडे असून सूहित अभ्यंकर यांनी हे गीत गायलं आहे , गीताचे सहसंयोजन तन्मय संचेती च आहे तर ग्राफिक डिझाइन कल्पक निगडे यांनी तयार केलं. गाण्याचे एडिटिंग अभिषेक वडजे यांचं आहे. गाण्याचे छायाचित्रकार स्वप्नील पंगती यांचं आहे.
त्यांच्या या अल्बम साठी झील इन्स्टिट्यूट चे सचिव जयेश काटकर सर, झील इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर प्रदीप खांडवे सर, प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी, गीतकार, संगीतकार अवधूत गुप्ते, स्वप्नील जोशी, कोरिओग्राफर राहुल माने, रोहित माने, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. राजन धसे, अक्षर इंगळे, सागर भूमकर आणि अभिनेते अनिल नगरकर यांनी शुभेच्छा दिल्या.
श्रेयस यांच कुटुंबीय नेहमीच त्यांच्या पाठीशी असतं. त्यांच्या यशाचं श्रेय ते त्यांच्या आई -वडील आणि पत्नी गायत्रीला देतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा! रसिकांनी हा अल्बम जरूर पहावा आणि भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन ‘सासो में तुमच्या’ संपुर्ण टीमकडून करण्यात आले आहे.