प्रतिनिधी: अवधुत सावंत
नवी मुंबई – घरमालकाचे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या पेइंग गेस्ट महिलेस अटक करण्यात रबाळे MIDC पोलिसांना यश आले आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी महिला आणि आरोपी महिला यांची मागील एका महिन्यापासून ओळख झाली होती. तेव्हापासून फिर्यादी यांनी सदर महिलेस पेइंग गेस्ट म्हणून घरी राहावयास ठेवले होते. फिर्यादी महिला या गावी गेल्या असताना सदर महिलेने फिर्यादी यांच्या घरातील ७,८४,०००/- रु. किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५,०००/- रु. चोरी केली असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रबाळे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून सदर महिलेस चिंचपाडा, ऐरोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून १४.८ तोळे सोन्याचे दागिने व ७०० रु. रोख रक्कम असे एकूण ६,६७,२००/- रु. किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे.