प्रतिनिधी: अवधुत सावंत
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या बोलेरो वाहनाच्या मालकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत मुंब्रा खाडीत आढळल्यानंतर राज्यात एकाच खळबळ उडाली आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एन.आय.ए कडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास ए.टी.एस कडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी ए.टी.एस कडे दिलेला आहे.
या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात.
सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते.
स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे,
प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तो देखील आमच्याकडे आहे आणि म्हणून ए.टी.एस कडे हा तपास दिला आहे.
पण एन.आय.ए कडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही” असंही शेवटी ते म्हणाले..