Latest News आपलं शहर महाराष्ट्र

कल्याणच कोविड सेन्टर बनतंय मृत्यूचा सापळा; डॉक्टरच बनले मृत्यूचे व्यापारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या लाल चौकी परीसरातील कोविड सेंटर मध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु आहे. या ठिकाणी डॉ.आलम आणि समित गर्गे हे दोघेजण यात सामील आहे. संकटकाळात जेव्हा एकीकडे सर्वजण आपापल्यापरीने सेवा आणि मदत पुरवू पाहत आहेत, तेव्हा दुसरीकडे असे समाजकंटक मढ्यावरचं लोणीही विकू पाहतात तेव्हा संताप येतो. काही इसम या ठिकाणी कोणतीही सेवा देण्यासाठी येत नाही. विनाकारण त्यांचा या कोविड सेन्टर मध्ये संशयास्पद वावर असतो. या ठिकाणी रुग्णांसाठी येत असलेल्या रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यासाठी हि गिधाडे टपलेली असतात. राज्य सरकार कडून रेमडेसिवीरची एकच किंमत सर्वत्र लागू आहे. तरीही या ठिकाणी १ रेमडेसिवीर इंजेक्शन हे  ₹१ ८,०००/- ते २५,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकले जात आहे. सदर ठिकाणी मृत्यूचा दरही काहीसा जास्त आहे. जीव वाचवण्याचे पवित्र काम करणारे डॉक्टर ह्या महामारीच्या काळात जर व्यापार करण्याला महत्व देत असतील तर त्यांना देव समजावं कि दानव असा प्रश्न पडतो.

रुग्णांच्या जिवापेक्षा जेव्हा खिसे भरण्याचे काम या डॉक्टरांना महत्वाचं होतेय तेव्हा असहाय्य् आणि कोरोनामुळे मनातून हादरलेल्या जनतेने कोणाकडे बघावं? मुळात आपला रुग्ण जो मरणाच्या दारात उभा आहे, तो किती वेळ तग धरू शकतो? तो हयात असे पर्यंत न्याय मागावा कि औषध ह्याचा विचार कारण्याइतकाही अवधी हाती शिल्लक उरलेला नसतो.
त्यामुळे हा खालच्या पातळीचा व्यापार त्वरित थांबावा आणि या गिधाडांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून जोर धरत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *