मराठवाडा महाराष्ट्र

कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली असल्याने वडवणी तालुक्यातील सरपंचात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता व कामात गैरप्रकार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संतोष अभिमान शिंदे व धनंजय माणिकराव शिंदे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सदरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन 2018- 19 या खर्चाबाबत कोणतेही पुरावे सरपंच परमेश्वर राठोड यांनी सादर केले नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांचा दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजीचा प्रस्ताव अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी मान्य करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार सरपंच श्री परमेश्वर दगडू राठोड, रा. हरिश्चंद्र पिंप्री, ता. वडवणी, जि. बीड यांना उर्वरीत कालावधीसाठी अपात्र ठरवले आहे. सदरील या निकालाने वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरील सरपंच परमेश्वर राठोड यांना निर्णयविरुध्द संबंधितांस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 (3) नुसार 15 दिवसांचे आत राज्य शासनाकडे अपील करता येईल. याप्रकरणी तक्रारदार संतोष शिंदे यांच्याकडून अँड. एस.जे साळुंखे व अँड. अमर लवटे यांनी काम पाहिले

तालुक्यातील अनेक सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!

दरम्यान वडवणी तालुक्यातील हरीचंद्र पिंपरी येथील सरपंच परमेश्वर राठोड यांच्यावर प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या व पात्रतेच्या कार्यवाही ने वडवणी तालुक्यातील सर्व सरपंचांनी मध्ये एकच खळबळ उडाली असून दरम्यान आपल्या ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता व इतर कारणामुळे अपात्र ठरविण्याची कार्यवाही झाल्याने अशाच प्रकारे वडवणी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये नेहमीच अनियमितता दिसून येते आता त्यांचेही धाबे दणाणले असून भ्रष्टाचाराला पाठराखण करून कामात अनियमितता करणाऱ्या सरपंचांना घाम फुटला असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार दिसून येत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *