Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मुंबई व दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने डब्ल्यूएचओ ने दिला सतर्कतेचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. व्हायरस अजूनही संपलेला नाही असं देखील डब्ल्यूएचओ (WHO) ने म्हटलं आहे. भारतात बुधवारी कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढवली आहे. मृत्यूदर जरी नियंत्रणात असले तरी देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डब्ल्यूएचओ ने म्हटलं की, कोरोना व्हायरसमुळे अजूनही जीविताचा धोका कायम आहे.

अमेरिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ

ओमायक्रॉन व्हायरसचा बीए.२ व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या न्यूझीलंडमध्ये बुधवारी कोरोनाचे ९,४९५ नवे रुग्ण वाढले. ज्यापैकी १,८२८ रुग्ण हे ऑकलँडमध्ये आढळले आहेत. चीनमध्ये २९,३१७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमध्ये २५,००० हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. या भागात लॉकडाऊन लागू आहे.

दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याने चिंता नसली तरी देखील सतर्क राहण्य़ाची गरज आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३ नवीन रुग्ण वाढले आहेत. १७ मार्चनंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामध्ये ६८ जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. राजधानी दिल्लीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ५० टक्के वाढ पाहायला मिळाली. पण मृतांमध्ये वाढ झालेली नाही. दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण वाढले होते. तर बुधवारी २९९ रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत ५०४ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *