सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारताच्या कोरोनाविरोधी लसयुद्धात महत्वाचा आणि मोठा विक्रम करत भरारी घेतली आहे. खरंतर हा महाविक्रम आहे. आज भारताने २०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा सर केला. आज सकाळच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.९८ कोटी (१,९९,९८,८९,०९७) मात्रांचा टप्पा पार केला. २,६३,२२,३४५ सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. याचा अर्थ आतापर्यंत देशात २०० कोटी डोसचा आकडा गाठला गेला आहे.
देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम १६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ३.७९ कोटीहून जास्त (३,७९,८२,२५१) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे १० एप्रिल २०२२ पासून १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,10,322
2nd Dose 1,00,79,660
Precaution Dose 60,21,211
FLWs 1st Dose 1,84,27,518
2nd Dose 1,76,52,093
Precaution Dose 1,14,59,871
Age Group 12-14 years
1st Dose 3,79,82,251
2nd Dose 2,62,02,322
Age Group 15-18 years
1st Dose 6,08,43,400
2nd Dose 5,01,13,916
Age Group 18-44 years
1st Dose 55,88,87,272
2nd Dose 50,58,64,044
Precaution Dose 62,19,363
Age Group 45-59 years
1st Dose 20,35,68,118
2nd Dose 19,45,59,339
Precaution Dose 45,13,607
Over 60 years
1st Dose 12,73,60,055
2nd Dose 12,15,70,899
Precaution Dose 2,81,53,836
Precaution Dose 5,63,67,888
Total 1,99,98,89,097
- भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या १,४३,४४९ इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ०.३३% इतकी आहे
. - परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४% झाला आहे. गेल्या २४ तासात १७,७९० कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून ४,३०,८१,४४१ झाली आहे.
- गेल्या २४ तासात २०,५२८ नवे रुग्ण आढळले.
- गेल्या २४ तासात एकूण ३.९२,५६९ चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ८६.९४ कोटींहून अधिक (८६,९४,२५,६३२) चाचण्या केल्या आहेत.
- साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.५५% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.२३% आहे.