संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: विष्णू गायकवाड
भाईंदर : मुंबईसाठी सोनसाखळी चोरी काही नवीन बाब नाही पण काही वर्षांपासून मुंबई पोलिसांनी या भुरट्या चोरांना चांगलाच आळा घातला आहे तरीही अधून-मधून हे चोर आपलं डोक वर काढतच असतात तर पोलीस सुद्धा ते ठेचण्यासाठी आपला दंडुका घेऊन सज्जच असतात.
भाईंदर पूर्व मधून चैनसाखळी चोरी करून दिल्ली गाठणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी थेट दिल्लीत बेडया ठोकून हे पुन्हा सिद्ध केल आहे.
वारंवार पोलिसांकडून जनजागृती करूनही जनता आपल्या मैlल्यवान वस्तू सांभाळण्यास कधी -कधी असमर्थ्य ठरते, चोर जनतेच्या बेसावध पणाचा फायदा घेत संधी साधतात व जनतेची तारांबळ उडते.
असाच एक प्रकार भाईंदर( पूर्व ) येथे घडला, सौ. राजेश्वरी विनोद सिंग वय वर्ष 40 या 8 फेब्रुवारी रोजी रोजच्या प्रमाणे आपल्या मुलाला बसने शाळेत पाठवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या एव्हढ्यात दोन अनोळखी दुचाकी स्वारानी त्यांच्या गळ्याला हिसका मारत त्यांची दिड तोळ्याची सुमारे 52000 रु किमतीची सोनसाखळी घेऊन पसार झाले होते.
प्रसंगी त्यांनी सतर्कता दाखवत नवघर पोलीस स्टेशन गाठलं, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या आदेशानुसार ठाण्यात भा. द. वि. स. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिसांनी आपल्या तपास कार्याला गती दिली व दिवस रात्र एक करून शेवटी पोलिसांना यश मिळाल, गुन्हेगारांची तपासाजोगी माहिती तपासकर्त्यानां मिळाली मालवणी मुंबई येथे राहणारे ते गुन्हेगार तांत्रिक बाबींवरून तपासणी केली असता आरोपी थेट दिल्लीला दिसत होते.
नवघर पोलिसांनीही आपली स्वारी थेट दिल्लीकडे वळवली व आरोपीना ताब्यात घेतले आणि गल्लीत चोरी करणाऱ्या चोरांच्या थेट दिल्लीत मुसक्या आवळल्या.
आरोपी 1) रिजवान हैदर अली हुसेन हैदर वय वर्ष 25 रा मालवणी मुंबई, मूळ उत्तर प्रदेश, 2)शहजाद उर्फ विकी इमाम मोहम्मद आरिफ वय वर्ष 36 मूळ रा. अमरोहा उत्तर प्रदेश यांच्या कडून सुमारे 52000रू. किंमत असलेली सोनसाखळी व गुन्ह्यात वापरली गेलेली बजाज पल्सर ही दुचाकी असा अंदाजे 82000 किंमतीचा येवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 01, डॉ. शशिकांत भोसले, सह. पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, यांच्या मार्गदर्शना खाली मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पो नि- प्रकाश मसाळ (गुन्हे) स पो नि- योगेश काळे, पो उ नि- संतोष धाडवे, पो उ नि- प्रमोद पाटील, पो ना-भुषण पाटील, पो शि- गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत, विनोद जाधव यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.