संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्वेला मानपाडा रोडवरील ‘कस्तुरी प्लाझा’ शेजारील ‘रिलॅक्स बार’ व त्यांच्या आजूबाजूची दुकाने अनधिकृत असून ती जागा चेतन हौसिंग सोसायटीची असून काँग्रेसच्या माजी नगरसेवक यांनी अनधिकृत पणे ‘रिलॅक्स बार’ व परिसरातील दुकाने बांधली याविषयी चेतन हौसिंग सोसायटीने उच्चन्यायालयात दावा दाखल करुन न्यायालयाने चेतन हौसिंग सोसायटीचा दावा मान्य करून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा व त्याची चित्रफित बनवून त्याचे तीन महिन्यांत न्यायालयात सादरीकरण करण्यात यावे असा आदेश देऊनही सदर गोष्टीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असून अजूनपर्यंत कडोंमपाच्या ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी काही ही कारवाई केली नाही फक्त याविषयी फायली डोंबिवली-कल्याण महानगरपालिकेच्या कार्यालयात फिरत आहेत.
यावरून असे वाटते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाठीशी घालून उच्च न्यायालयाच्या आदेशला केराची टोपली दाखविली आहे. कोर्टाचा आदेश सप्टेंबर २०२१ चा होता व कारवाईची मुदत १७ जानेवारी २०२२ ला संपली असून अजून फक्त फाईलस् डोंबिवली-कल्याण-डोंबिवली कार्यालयात फिरत आहेत. वरील सर्व घटना पहाता कडोंमपाचे अधिकारी व ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामागे नक्की गौडबंगाल काय असू शकते याची उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू आहे.