मराठवाडा

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

बबलू कदम, वडवणी, ता. प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील बिचकुलदरा तांड्यातील एक ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्त्या तथा ऊसतोड मजुरांच्या नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे, मोहन जाधव यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी चव्हाण सर, माकपचे कॉ. किरण ढोले, कॉ. रवी उरूनकर, एसएफआयचे जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका अध्यक्ष ऋषीकेश कलेढोन, विजय टकले, अमोल राठोड आदी उपस्थित होते.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अनेक ऊस तोड मजुरांचे कुटुंब गाव, घर व नातेवाईक सोडून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. वडवणी शहरापासून ३ कि.मी.आंतरावर असलेल्या बिचकुलदरा तांडा येथील विजय खिरू राठोड हा तरुण ऊसतोड मजूर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच जय भवानी साखर कारखाना गडी या ठिकाणी कुटुंबासह ऊसतोड करीत होता. गेल्या 16 फेब्रुवारी रोजी तो मजूर ऊस तोडीचे काम संपवून कुटुंबासह घरी परतत असताना बीड-पिंपळनेर-माजलगाव या मधल्या रस्त्यावरून गावी येत असताना या शिवारात ट्रॉक्टरच्या ट्रॉली खाली सापडल्याने त्याचा चिरडून मृत्यू दुर्दैवी झाला. या दुर्दैवी तरुणाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.

गरीब कुटुंबातील तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वडवणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या गरीब कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *