Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

गुन्हे शाखा घटक-४ चे कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री.मनोहर नरसप्पा पाटील यांना ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ पदक जाहीर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ येथील कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. मनोहर नरसप्पा पाटील यांना १५ ऑगस्ट २०२१ ला स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या कडील ‘विशेष तपास पदक’ जाहीर केले आहे.

थोडक्यात हकीगत अशी की मुंब्रा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं ५५७/२०१६ भा.द.वि कलम ३०२,२०१, ३६३,३६५ ठाणे सेशन केस क्र.१०३/२०१७ या गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती साधनादेवी अवधेश भगत रा. गावदेवी मंदिराजवळ, मुंब्रा बायपास रोड, ठाणे यांनी दि.१२/११/२०१६ रोजी तिच्या ७ वर्षे वयाच्या कु. रंजन नावाच्या अल्पवयीन मुलाची परिसरात खेळत असताना अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणास्तव अपहरणाची फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याचा कोणत्याही स्वरूपाचा धागादोरा व पुरावा उपलब्ध नसताना फिर्यादी च्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून अपहरीत मुलाची विचारणा केली होती हाच दुवा धरून तपासिक अधिकारी यांनी मोबाईल चे तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपी संतोष रामरूत शर्मा (वय २५ वर्षे) रा. गावदेवी मंदिराजवळ, बायपास रोड, मुंब्रा, जिल्हा ठाणे यांस ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या तपासात आरोपी हा फिर्यादीच्या शेजारीच राहत असल्याने त्याचे फिर्यादी सोबत एकतर्फी प्रेम होते. फिर्यादी ज्या ज्या वेळी घरी असे त्या त्या वेळी अपहरित मुलगा रंजन हा तिच्या सोबत वावरत असल्याने आरोपीस फिर्यादी सोबत लगट करण्याचा सतत प्रयत्न करूनही त्यास संधी मिळात नव्ह्ती म्हणून मार्गातील अडसर कायमचा दूर करण्याचा उद्देशाने आरोपीने सदर मुलाचे अपहरण करून त्याला निर्मनुष्य असलेल्या पडक्या चाळीतील एका खोलीत नेऊन त्याचा गळा दाबून जीवे ठार मारून त्याची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने सदरचे प्रेत खड्डा खोदून पुरून टाकले. सदर गुन्ह्यातील नमूद आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा. सत्र न्यायालय ठाणे यांनी पुराव्यानिशी आरोपी विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी संतोष शर्मा यांस भा.द.वि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ₹ ५०००/- दंड, भा.द.वि कलम ३६३ अन्वये ३ वर्षे सजा व ₹ १०००/- दंड आणि भा.द.वि कलम २०१ अन्वये ३ वर्षे सजा व ₹ १०००/- दंड अशी शिक्षा दि.२०/०२/२०२१ रोजी ठोठावली आहे.

सदर तपासात पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन, सहा.पोलीस उपनिरीक्षक शंकर देसाई, पो.हवा सुभाष शेलार, महिला पो.ना रेश्मा गांगुर्डे या टीमने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस शिक्षेस पात्र ठरवले.

सदर गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाची केंद्र शासनाने दखल घेऊन १५ ऑगस्ट २०२१ च्या शुभ मुहूर्तावर ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ म्हणून मा. केंद्रीय गृहमंत्री यांचेकडील ‘विशेष तपास पदक’ पोलीस निरीक्षक श्री.मनोहर नरसप्पा पाटील, उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ यांना जाहीर झाले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *