संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक १५/०३/२०२२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल चोले व पोलीस नाईक मसळे असे बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दिवसपाळी ड्युटी करत असताना उल्हासनगर येथील ड्युटीवरील पोलीस कॉन्स्टेबल मसने यांनी फोनद्वारे त्यांना कळविले की डाऊन बदलापूर लोकल ट्रेन मध्ये ऐक महीला प्रवाशी यांची लाल रंगाची बॅग विसरलेली आहे तरी सदरची महिला उल्हासनगर येथे उतरली आहे सदरची गाडी तात्काळ अटेंड करा असे कळविल्याने पोलीस कॉन्स्टेबल चोले यांनी सदरची लोकल बदलापूर येथे अटेंड केली असता सीएसटी बाजूकडील पहिल्या महीला जनरल डब्यामध्ये लाल कलरची बॅग मिळून आल्याने ते रेल्वे पोलीस चौकीमध्ये आणुन आतील सामानाची खात्री केली असता खालील नमूद सामान त्यात मिळून आले.
१) लाल रंगाची बॅग.
२) २,५०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे साडेचार तोळ्यांचे गंठण.
३) ५१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे ऐक तोळ्यांचे मंगळसूत्र.
४) ५१,०००/- रुपये किमतीचे ऐक तोळ्यांची सोन्याची चैन.
५) ५०००/- रुपये किमतीचे सोन्याची १ ग्रॅमची छोटी चैन.
६) १०,०००/- रुपये किंमतीची कानातले २ ग्रॅम टॉप्स.
७) ३०,०००/- रुपये किंमतीची सोन्याचे ६ ग्रॅमचे झुमके.
८) १०,०००/- सोन्याचे अशोक चक्र २ ग्रॅम.
९) १०,०००/- सोन्याचे कानातले वेल २ ग्रॅम.
१०) ५००/- सोन्याची नथ
११) ५००/- रुपये किमतीची सोन्याची बाली.
१२) ७,५००/- रुपये किमतीचे सोन्याचे १९ मनी.
१३) जुने वापरते कपडे.
असा एकूण ऐवज ४,२५,५००/- रुपये.
सदर बॅगेची व आतील सामानाची खातरजमा करून चौकशी केली असता महिला प्रवाशी नामे शीतल प्रशांत गायकवाड रा. नवी मुंबई यांचीच ती असल्याबाबतची खात्री करून सदरची बॅग व आतील सामान त्यांचे ताब्यात दिले आहे. शीतल प्रशांत गायकवाड यांनी कर्तव्य तत्पर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी.शार्दुल व कल्याण रेल्वे पोलीसांचे खुप खुप आभार मानले आहेत.